Breaking News

राऊळगाव स्फोटातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेवर शोक प्रकट *

विशेष प्रतिनिधी – नागपूर

मुंबई/नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved