Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* पोलिसांनी २४ जनावरांची केली सुटका *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहिती आधारे पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत छापा टाकुन गोवंश जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनाला पकडुन चालक अफरोज मजीद बेग याला ताब्यात घेतले.
तसेच गोवंशाची वाहतुक सुलभकरण्यासाठी पायलटींक करणारे बोलेरो निओ वाहन व त्याचा चालक शेख भोलु शेख नकीम वय ४५ वर्ष रा. नागपूर यास सुध्दा ताब्यात घेवुन आयशर मधील एकुण २४ नग जनावरे गोवंश (बैल) यांची सुटका केली. व आरोपीतांविरुध्द पोस्टे रामनगर येथे अप.क्र.२१३२२०२६ कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा १९६० व कलम ५ (अ), ९,११ महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ सुधारित २०१५ व कलम ३ (५), ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात एकुण २४ नग जनावरे (गोवंशीय बैल) सह एक आयशर वाहन क. MH34-BG-3788, बोलेरो निओ क्र. CG-08-AU-9237, तिन नग मोबाईल असा एकुण किं.अं. ३०,२५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, इमरान खान, पोअं शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना