Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* बावनकुळे यांची राजकीय रणनीती यशस्वी *
* दोन अधिकृत उमेदवारांसह भाजपा पुरस्कृत तिसराही उमेदवार विजयी *
* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते राज्यसभा निवडणुकीचे भाजपाचे पर्यवेक्षक *
विशेष प्रतिनिधी – नागपूर
मुंबई/नागपूर :- ओडिशा राज्यातील आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे महसूलमंत्री व या निवडणुकीसाठी भाजपने नियुक्त केलेले केंद्रीय पर्यवेक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ओडिसा भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. भाजपाने दोन अधिकृत उमेदवारांसह भाजपा पुरस्कृत तिसराही उमेदवार विजयी झाला.विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी , हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेचा व भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा विजय आहे. सर्व आमदारांनी एकजुटीने व एकनिष्ठतेने मतदान केले त्यामुळे हा विजय प्राप्त होऊ शकला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी तसेच ओडिशा भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांचे आभार मानले.ओडिसा मध्ये भाजपचे सरकार आहे. भाजपकडे ८२ आमदारांचे बळ आहे. तर ६५ आमदारांची संख्या विरोधकांकडे आहे. आज झालेल्या निवडणुकीत ४ जागांसाठी निवडणूक एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. भाजपा चे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल व विद्यमान राज्यसभा सदस्य सुजित कुमार हे अधिकृत उमेदवार तर माजी राज्यमंत्री दिलीप राय हे भाजपाचे समर्थित उमेदवार होते. तथापि, मतांचा कोटा दोन उमेदवार विजयी होतील इतकाच भाजपाकडे अजूनही भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक व महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आखलेल्या व्यूहरचनेमुळे तीनही उमेदवार विजयी झाले.गेले पाच दिवस बावनकुळे ओडिशा येथे मुक्काम ठोकून होते. त्यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा केली. प्रमुखांसोबत बैठकी घेतली.
ज्वाला समाचार सच का सामना