Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव शहरात अन्याय, भ्रष्टाचार, बेकायदेशीर अतिक्रमण आणि पदाचा दुरुपयोग या गंभीर आरोपांवरून उभारलेल्या आमरण उपोषणाने अखेर प्रशासनाला झुकावे लागले. नगरपंचायत मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी या आंदोलनाची सांगता करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते वसंत शामरावजी कोमेजवार यांच्या नेतृत्वाखाली १६ मार्च रोजी क्रांती चौक येथे सुरू झालेल्या या बेमुदत आमरण उपोषणाने शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. संबंधित नगरसेवक बाळू उर्फ शशिकांत धुमाळ व सौ. प्रणाली धुमाळ यांच्या विरोधात सार्वजनिक रस्ते, खेळाचे मैदान व शासकीय जागांवर कथित पक्के अतिक्रमण केल्याचे आरोप आंदोलनातून पुढे आले.
याशिवाय शहरातील १५ ते २० मोक्याच्या जागांवर अतिक्रमण करून दुकान गाळे उभारणे, बेकायदेशीर भाडे वसुली, माहिती अधिकारांतर्गत माहिती न देणे, तसेच क्रांती चौकातील सुमारे १५० वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाच्या तोडीचा प्रयत्न यांसारखे गंभीर मुद्दे ऐरणीवर आणण्यात आले. “साई वृद्धाश्रम” प्रकरणातही निधी व जमिनीच्या वापराबाबत मोठ्या अनियमिततेचे आरोप करण्यात आले.उपोषणाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळाल्याने प्रशासनावर कारवाईचा जबरदस्त दबाव निर्माण झाला. अखेर मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी सर्व मागण्यांवर सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण लिंबू सरबत पिऊन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, उपोषणकर्ते वसंत कोमेजवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की
“लेखी आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर यापेक्षा तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल.”
या आंदोलनामुळे राळेगावातील कथित गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, आता प्रशासन प्रत्यक्षात किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना