Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* चिमूर तालुक्यातील सिरपुर येथे मय्यतीला जात असताना वाटेतच घडला अपघात *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक. ०७/०४/२०२६ ला दुपारी ०५:०० वाजताच्या सुमारास संताजी नगर चौक वडाळा पैकू चिमूर याठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर कांपा रोडवर सिमेंट मिक्सर व दुचाकी ची जबर धडक झाल्याने दुचाकी स्वार तिघांची प्रकृती गंभीर सांगितली जात आहे.दुचाकी स्वार चिमूर तालुक्यातील महालगाव येथील रहिवासी असून अजय धनपाल मेश्राम वय ३५ वर्षे, धनपाल रामचंद्र मेश्राम वय ६५ वर्षे राहणार महालगाव काळू, सुजाता केशव लिंगायत वय ४५ वर्षे राहणार पिराया तह.भिवापूर जिल्हा नागपूर येथील असून या तिघांनाही प्रथमोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे रेफर देऊन पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.अपघातातील दुचाकी वाहन क्रमांक MH-40 AH- 4059 व सिमेंट मिक्सर मशिन वाहन क्रमांक. MH-40 BW- 4043 असे आहे. या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना