jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* विविध कंपन्याचे २७६ टिन व बॉटल किंमत ४९, ३७०/- रुपयांचा माल जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील मौजा चंदनखेडा गावातील व्यक्ती अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करीत असल्याबाबत गोपनिय बातमीदार कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने मौजा चंदनखेडा येथील रहिवासी नामे कबीर मुस्तफा पठाण वय ४० वर्ष याचे राहते घरी छापा टाकुन पंचासमक्ष घराची झडती घेतली असता सदर इसमाचे ताब्यातून Hayward Beer 5000 टिन ९६ बॉटल, Tuborg Beer टिन – ९० बॉटल, Carlsberg Beer टिन – ९० बॉटल असा एकुण ४९, ३७०/- रु. किंमतीचा माल अवैधरित्या विक्री करीता बाळगल्याचे मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ४१४/२०२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा सचिन गुरनुले, जयसिंह, संतोष येलपुलवार, मिलींद जांभुळे, पोअं प्रफुल्ल गारघाटे व शशांक बादामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना