Breaking News

किराणा सामान व पिकअप वाहन चोरी करणारे तिन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* किराणा साहित्य, खाद्य तेल व दोन वाहनासह २२,७१,५२२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- सुरेश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०९/०१/२०२६ रोजी रात्रीला ०८:३० वाजताच्या सुमारास चालक रंजीत केशव बोबाटे रा. चिंचाळा यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. ३४- बीझेड-४४११ मध्ये किराणा साहित्य माल भरुन नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण राईस मिल चार्मोर्शी रोड येथील बंद परिसरात वाहन उभी करून दुसरऱ्या दिवशी दिनांक १०/०१/२०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता आले असता किराणा साहित्य भरुन ठेवलेली पिकअप वाहन त्या ठिकाणी नहोती. कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पिकअप वाहन किराणा साहित्य सह एकुण किं. १३,८०,६३९/- रु. चा माल चोरुन नेल्याचे आढळून आले असता पोलीस स्टेशन मुल येथे भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पो.स्टे. मुल येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय बातमीदार नेमुन व तांत्रिक पध्दतीने सखोल तपास करून ५ दिवसात गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील निष्पन्न आरोपी (१) अनुज बबलु सोनी वय २२ वर्ष, (२) विनय क्रिपाल परतेती वय २२ वर्ष दोन्ही रा. भाम्बाडा ता. उमरेठ जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) व (३) अंकित मुरद धुर्वे वय २२ वर्ष रा. राजगांव ता. मुखेड जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश) यांना जिल्हा छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथुन ताब्यात घेवुन अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरून नेलेला एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क.एम.एच.३४-बीझेड-४४११ किं. १०,००,०००/- रु. व सदर वाहनातील १५० बॉक्सेस स्नेहा खाद्य तेल किं. २,४१,०२६/- रु., ईतर किराणा साहित्य किं. ३०,४९६/रु. व आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली वाहन क्र.एम.एच.४९-बीझेड-०२३६ किं.१०,००,०००/- रु. असा एकुण २२,७१,५२२/-रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, पोअं दिलीप आदे, पोअं शंकर बोरसरे, पोअं संदीप चुदरी सर्व पो.स्टे. मुल आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

    1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण …

आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय केला जाहीर

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved