Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूर नगरीत श्रीहरी बालाजी महाराजांचा नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिमय, श्रद्धा व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. या पावन पर्वणीवर माघ शुक्ल दशमी, बुधवार दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता चिमूर नगरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान परिक्रमा भक्तिभावाने संपन्न झाली.

या प्रसंगी सकाळी श्रीहरी बालाजी महाराजांचा विधीवत अभिषेक व पूजा-अर्चा करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्री ८.३० वाजता हरिभक्त पारायण सौ. स्नेहल संतोष पित्रे (डोंबिवली) यांनी सादर केलेल्या नारदीय कीर्तनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर रात्री ११ वाजता श्रीहनुमानजींच्या मूर्तीची विधीवत पूजा करून हनुमान चालीसा प्रचारक मंडळ, खडसंगी यांच्या सुमधुर वाद्यवादनाच्या साथीने श्रीहरी बालाजी महाराजांच्या गर्भगृहाची परिक्रमा करण्यात आली. त्यानंतर नगरातील प्रमुख मार्गांवरून हनुमान वाहन परिक्रमा संपन्न झाली. परिक्रमेच्या समारोपप्रसंगी श्रीहनुमानजींनी बालाजी महाराजांना मार्ग प्रशस्त झाल्याचा पावन संदेश दिला.
ज्वाला समाचार सच का सामना