Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- संपूर्ण विश्वाचे शिल्पकार, सृष्टीचे आद्य अभियंता भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त चिमूर नगरीत सुतार समाजातर्फे भक्तिभाव, श्रद्धा व सामाजिक एकात्मतेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. श्री विश्वकर्मामय सुतार समाज बहुउद्देशीय संस्था, चिमूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती उत्सवाने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

नेहरू चौक येथून सुरू झालेली भव्य रॅली इंदिरा नगर चौक, बस स्थानक चौक, मासळ रोड दुकान लाईन चौक अशी नगरपरिक्रमा करीत पुन्हा नेहरू चौक येथे येऊन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रॅलीमध्ये समाजातील लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवे ध्वज, घोषवाक्ये आणि “श्री विश्वकर्मा महाराज की जय” च्या जयघोषाने संपूर्ण चिमूर नगरी दुमदुमून गेली.

यानंतर भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर भांदककर होते. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्ती कुमार उर्फ बंटी भांगडीया तसेच नगराध्यक्ष सौ.गीता लिंगायत यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून निलमभाऊ राचलवार, अमोद गौरकार, नलिनी लांडे, सोमेश्वर रासेकर, फागोजी पिंपळकर आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सुतार समाजाच्या कष्ट, कौशल्य व समाजउभारणीतील योगदानाचा गौरव केला.

या पवित्र प्रसंगी सुतार समाजाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच महिला सखी मंचच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, एकोप्याची भावना आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.
ज्वाला समाचार सच का सामना