Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- भांडेवाडी डम्पिंग परिसरातील आज दिनांक ३१/०१२०२६ रोजी दुपारी ३:२३ वाजताच्या सुमारास भिषण आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यावर आगीची भिषणता लक्षात घेता मनपाच्या विविध अग्निशमन केंद्रातून फायर टेंडरसह अग्निशमन पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या सह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली.

यावेळी पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणली गेली. आग पुन्हा पेटू नये याकरिता कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. भांडेवाडी येथील आगीत कोणतीही आर्थिक नुकसान तथा जीवित हानी, दुखापत झाली नसून परिस्थिती पूर्ण पणे नियंत्रणात आहे. आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या ७ फायर टेंडर घटना स्थळी दाखल असून मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बारहाते यांच्या मार्गदर्शनात आग नियंत्रणात आणली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना