Breaking News

राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व पदाधिकारी सन्मान सोहळा संपन्न

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारांना “कार्य गौरव पुरस्कार” *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- पत्रकारितेच्या निष्ठावंत आणि समाजाभिमुख कार्याला राज्यस्तरावर मानाचा मुजरा मिळाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ॲड.राहुल थोरात व सरचिटणीस केवल सिंग जुनी यांना “कार्य गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.दरम्यान प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी आणि सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.याशिवाय पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे, याची जाणीव या सन्मानाने पुन्हा अधोरेखित झाली. चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक प्रश्न, जनहिताचे विषय आणि लोकांच्या आवाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आल्याने जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चंद्रपूर शाखा चे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सतत जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या परिश्रमांची पावतीच ठरली आहे.चंद्रपूरच्या मातीतून उगवलेले हे शब्दयोद्धे आज राज्यभरात झळकले हा क्षण खऱ्या अर्थाने अभिमानाचा!

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved