Breaking News

चिमूर तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १” राबविण्यात येणार

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर:- महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या शासन निर्णय क्र. मराअ-2026/प्र.क्र.09/समन्वय-1, दिनांक 18.02.2026 अन्वये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुकास्तरावर मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर तसेच नागरिकांना Single Day Service Delivery द्वारे सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मार्च ते मे 2026 या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

चिमूर तालुक्यात या अभियानांतर्गत 7 मार्च 2026 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामपंचायत सभागृह, नेरी येथे, 14 मार्च 2026 रोजी धुनीबाबा मंदिर सभागृह, आंबोली येथे, 23 मार्च 2026 रोजी संताजी जगनाडे महाराज सभागृह, शंकरपूर येथे, 1 एप्रिल 2026 रोजी गुरुदेव सेवा आश्रम, गोंदोडा (जांभुळघाट मंडळ) येथे, 10 एप्रिल 2026 रोजी आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा, मासळ येथे, 17 एप्रिल 2026 रोजी राजीव गांधी विद्यालय, खडसंगी येथे, 30 एप्रिल 2026 रोजी मानकादेवी सभागृह, भिसी येथे, 8 मे 2026 रोजी नगर पंचायत कार्यालय, भिसी येथे आणि 15 मे 2026 रोजी तहसील कार्यालय, चिमूर येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, 7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7/12 व 8अ उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र वाटप, अकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन व नव्या सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, पांदन रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरकुलासाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, अॅग्रीस्टेक व पीएम किसान संदर्भातील मार्गदर्शन तसेच भूसंपादन व कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सदर शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, तसेच चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीधर राजमाने, चिमूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved