Breaking News

मोहाडी (नले) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- सिंदेवाही पासून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या मोहाडी (नले.) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर किरायाने आहे. बँकेला पार्किंगची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असतांना सुद्धा मोहाडी नले. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांची वाहने आणि बँकेच्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा ठेवण्यात येत असल्यामुळे वाहतूकीची दिवसभर प्रचंड कोंडी होते.

मोहाडी हे गाव तालुक्यातील मोक्याचे ठिकाण असल्यामुळे दिवसभर दू चाकी,चार चाकी वाहने, जड वाहतूक, दिवसभर बसेस बँकेच्याच मुख्य रस्त्याने ये- जा करीत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून आबालवृद्ध आणि छोटे मुले यांना बँकेच्या दुतर्फा ठेवण्यात येत असलेल्या वाहनामुळे प्रचंड त्रास होतो.अंगणवाडीची बालके, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तसेच माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तथा आबालवृद्ध बँकेच्याच रोड ने ये जा करीत असल्यामुळे आणि बँकेला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची दिवसभर प्रचंड कोंडी होते. बँकेला सुद्धा पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे बँकेचे ग्राहक रस्त्याने इकडे तिकडे भटकत असतात.बँकेत येणाऱ्या वृद्ध ग्राहकांना सुद्धा वाहतूक कोंडीचा भयंकर त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.

पुढील अडचणी लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि संचालक मंडळानी बँकेला तात्काळ पार्किंग व्यवस्था असणारी जागा किरायाने बघावी अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे आणि ग्रामस्थांना होणारा वाहतुकीचा कोंडमारा सोडावावा.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved