Breaking News

दुचाकी व ट्रॅव्हलर अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक. २१/०२/२०२६ ला नेरी नवरगाव मार्गावरील खुटाळा बस्टॉप जवळ सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान दुचाकी व ट्रॅव्हलर यांच्यात समोरा – समोर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाला असून नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

मृतक हितेश कचरुजी गुरुनुले वय २७ वर्षे राहणार खुटाळा व गंभीर जखमी आशिष मन्सराम श्रीरामे वय २९ वर्षे राहणार खुटाळा येथील रहिवासी असून दोघेही दुचाकीने औषधे आणण्यासाठी नेरीकडे जात असताना नेरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या फोर्स कंपनीच्या ट्रॅव्हलर क्रमांक.MH40 AK 7898 वाहणाने दुचाकीला जबर धडक दिल्याने धडकेची तीव्रता इतकी जोरदार होती की दुचाकीस्वारास उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला असून शव शवविच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.

सध्या स्थितीत वातावरण तापले असता या दरम्यान, संबंधित ट्रॅव्हलर वाहन चालकावर भारतीय दंड संहिता नुसार अप.क. व कलम – 293/2026 कलम 281,125 (a),125 (b), 106 (1) 184 मो.वा.का. दाखल करण्यात आला आहे. सदर ट्रॅव्हलर वाहन व दुचाकी वाहन चिमूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. ट्रॅव्हलर चालक अमोल गिरडे (रा. नेरी) यांना घटनास्थळ पंचनामा करून पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेतले होते.ट्रॅव्हलर वाहणाच्या दस्तामध्ये तृटी असल्याचेही समोर आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved