Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- वंचित बहुजन आघाडी राळेगाव तालुक्याची नुकतीच तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यवतमाळ पुर्वचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक व गटनेते डॉ.निरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी घोषित करण्यात आली.राळेगाव तालुक्यातील वंचित बहुजन घटकातील जनतेची पकड आणि तालुक्यातील जनसंपर्क व कार्य पाहून विकास मुन यांची तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
या निवडीमुळे राळेगाव तालुक्यात वंचित घटकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीने व जोमाने सर्व जागा लढविणार असल्याचे संकेत विकास भाऊ मुन यांनी यावेळी दिले.ही निवड सर्व स्तरातील कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झाली आहे.
सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो असे मत विकास भाऊ मुन यांनी व्यक्त केले. असेच सहकार्य येणाऱ्या निवडणूकीत दाखवावे व आपले प्रतिनिधी पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये पाठवावे असे आवाहनही विकास भाऊ मुन यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका महासचिव प्रकाश कळमकर,उपाध्यक्ष राहुल उमरे,विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश फुलमाळी,जिल्हा उपाध्यक्ष धनराजजी लाकडे, कार्याध्यक्ष शैलेश बेलेकर,शहर अध्यक्ष दिपक आटे, उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, अजय दारुंडे, चंद्रगुप्त भगत, प्रविण वावरे,कायदेशीर सल्लागार ॲड. मधुसूदन अलोणे,राजेंद्र ठमके,संजय ताकसांडे, संजय पुनवटकर, अविनाश पवार, गंगाराम आत्राम, गजेंद्र वाळके, सुधाकर लोहवे,संतोष घनमोडे,युवराज भरणे, इंद्रजित लभाने,अक्षय ढाले, उमेश कांबळे, प्रशांत लाकडे, शतीष शिखरे, संघटक अफरोष शेख, राजेंद्र ताकसांडे, नंदु मडावी, सौ. अश्विनी ताई फुलमाळी, सौ. प्रतिभा वरडकर,सौ.साधना गांजरे,सौ.सुरेखाताई वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना