jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” महिला गंभीर जखमी – उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – आज दिनांक. ०८/०५/२०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मुरपार येथील राहिवासी सुंदराबाई रातीराम दोडके वय ६४ वर्षे यांचेवर सकाळी ७ वाजताच्या सुमारास संरक्षित वन क्रमांक. ३४८ मध्ये तेंदूपत्ता तोडत असतांना जंगली डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून गावकऱ्यांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच उपचारादरम्यान आर. एफ.ओ. के.बी देऊळकर यांच्या मार्गदर्शनात यू.बी लोखंडे क्षेत्र सहाय्य्क मुरपार, आर.बी. केदार वनरक्षक मुरपार यांनी घटनास्थळ पंचनामा करीत जखमीची भेट घेण्यात आली असून पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना