Breaking News

सिडीसीसी बँकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीयाचे आरक्षण डावलून कोट्यावधीचा भ्रष्टाचार

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत जी मुलं मुली भरती करण्यात आले त्यांनी बैंक अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक व बैंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांना 25 ते 40 लाख रुपये देऊन भरती घेण्यात आली असल्याचा आरोप करून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैंकेच्या कर्मचाऱ्यांची मुलं मुली व नातेवाईक कसे पैसे घेऊन लावले गेले त्याची यादीच पत्रकांरासमोर ठेऊन ज्या कर्मचाऱ्यांची भरती झाली त्यांचे व त्यांच्या आई वडीलासह नातेवाईकांचे बैंक खात्याची चौकशी करावी अशी मागणी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती चौकशी समितीच्या अध्यक्षाकडे व एसीबी कडे करू असा इशारा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहें.

सिडीसीसी बैंकेच्या 360 पदांच्या नोकर भरतीत सगळे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाघेवाण केली व मागासवर्गीयांचे आरक्षण संपवून नोकर भरती जानेवारी 2025 ला घेण्यात आली होती, दरम्यान आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने नोकर भरती विरोधात तब्बल 28 दिवस आंदोलन केल्यानंतर माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती च्या आंदोलनकर्त्यांना नोकर भरतीच्या चौकशी चे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या पुढाकारने आमरण उपोषकर्ते मनोज पोतराजे व रमेश काळाबांधे यांनी आमरण उपोषण सोडले होते, काही दिवसातच विभागीय सहनिबंधक वानखेडे यांच्या आदेशाने नोकर भरतीची चौकशी समिती नेमून बैंकेच्या सर्व दास्तावेज तपासल्या जातं आहें व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी चौकशी समिती पुढे आपली पुरावयासह माहिती देणारं आहें, या पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव संघर्ष समिती चे समन्वयक राजू कुकडे, सूर्या अडबाले, संजय कन्नावार, मनोज पोतराजे, अनुप यादव, नभा वाघमारे,महेंद्र खंडाळे, दिनेश एकवनाकर इत्यादीची उपस्थिती होती

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved