Breaking News

संस्कार शिबिरार्थ्यांनी केले पक्षी निरीक्षण

सिल्ली येथील तलावावर क्षेत्र भेट

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)-संस्कार चळवळ भंडारा व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरार्थ्यांना चला पक्षी पहायला’ या उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण व पक्षीगणना उपक्रम सिल्ली येथील तळ्यावर क्षेत्र भेट देऊन पाहणी करण्यात आली.शिबिरार्थ्यांना पक्षी व फूलपाखरे तसेच निसर्गाच्या विविध घटकांच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, निसर्ग संवर्धनविषयक जाणीव जागृती कोवळ्या वयात तयार होत असल्याने प्रत्यक्ष कृती उपक्रम निःशुल्क संस्कार शिबिरात घेण्यात आले.चला पक्षी पहायला या उपक्रमा अंतर्गत निवडक ४५ विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षक आर. सी. रामटेके, पक्षी निरीक्षक राहुल मेश्राम, शिबिर प्रमुख विलास केजरकर, पक्षी निरीक्षक तथा जैवविविधता मार्गदर्शक अविल बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलावावर पक्षी व फुलपाखरे, जैवविविधता यावर निरीक्षण उपक्रम नुकताच घेण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक पक्ष्यांसोबत पाणथळी वरील पक्षी छोटा पान कावळा, टिटवी, पाणकोंबडी, बगळा, पोपट, बुलबुल, सुगरण, (साळुंखी) मैना, हरोळी, डव (कवळी), दयाळ, शेकाट्या, कमळ पक्षी, चांभार कुकळी अशाप्रकारे पक्षी पहावयास मिळाले. तसेच स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची ओळख निरीक्षणात देण्यात आली. यावेळी दुर्बिणीच्या सहाय्याने पक्षी फुलपाखरे ओळख व हिंदी, इंग्रजी, मराठी नावे, त्यांचे नर मादी रंग आकार फरक इत्यादी विस्तृत माहिती देण्यात आली.

अशाप्रकारे स्थलांतरित तर २६ प्रकारचे स्थानिक पक्षी विद्यार्थ्यांना बघायला मिळाले. तसेच संस्कार शिबिर व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील तलावावर स्थलांतरित पक्षी निरीक्षण करण्यात आले. स्थलांतरित पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती ज्यात यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच आढळलेला लालसरी, नक्टा, तलवार, गढवाल, गार्गेनी, चक्रवाक, चमचाचोच इत्यादी प्रजातीचे स्थलांतरित पक्षी दर्शन विद्यार्थ्यांना घडले.यावेळी तीन गटात विभागणी करण्यात आली होती. त्यामध्ये जिया देशमुख, श्रृती गभणे, प्रांजल आकरे, सांची सुखदेवे, प्राजक्ता ढुके, वैष्णवी बागडे, नैताली पारधी, संवेदना पडोळे, प्राजक्ता ढुके, वेदांती गभणे यांनी गटांचे नेतृत्व केले होते.त्यावेळी पक्षी निरीक्षक आर. सी. रामटेके, निसर्गमित्र तथा जैवविविधता मार्गदर्शक अविल बोरकर, शिबिर प्रमुख विलास केजरकर, वेदांत गभणे, श्रावणी पडोळे, प्रतिक साखरवाडे, श्रावणी गिऱ्हेपुंजे, पूर्वी हेडाऊ, पूर्वेश गिऱ्हेपुंजे, आराध्या लखडे, सोहम मस्के, मयुरी आकरे, मृन्मय साखरवाडे, नक्षत्र चोपकर, क्रिष्णा साखरवाडे, सुग्रा गिऱ्हेपुंजे, जिया देशमुख, वेदांती गभणे, संवेदना पडोळे, इत्यादींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved