Breaking News

तालुका काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे विविध मागण्यांवर घेतली पत्रकार परिषद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.१७/०५/२०२४ ला तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेचा उद्देश चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दैनंदिन शेतकरी शेतमजूर यांवर होणारे वाघांचे हल्ले तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रामदेगी सारख्या पर्यटन व तीर्थ क्षेत्रामध्ये गेट तयार करून सर्वसामान्य जनतेचे उदरनिर्वाह करण्यासाठी जे रोजगार स्थापन केले होते ते वनविभागाने हिरावले आणि या पर्यटन गेटमुळे अनेकांना मासभक्षक प्राण्यांमुळे जीव गमवावा लागला म्हणून विविध प्रकारच्या जनहितार्थ असलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहे सविस्तर वाचा 👇

(१) जंगलालगत १५ फुट जाळीचे कंपाऊड तयार करण्यात यावे.(२) मय्यत असलेल्या अंकुश श्रावण खोब्रागडे यांच्या परिवारातील एका व्यक्तीला चर्तुथ श्रेणी कर्मचारी म्हणून समायोजन करण्यात यावे.(३) निमढेला पर्यटन गेट व जिप्सी (पर्यटक वाहन) तात्काळ बंद करण्यात यावे.(४) रामदेगी देवस्थान सर्व पर्यटकांसाठी विनाअट खुले करण्यात यावे.(५) मय्यत अंकुश श्रावण खोब्रागडे यांचा मृत्यू वनविभागाच्या दुर्लक्षीत पणामुळे झाला त्यामुळे सर्व अधिकारी प्रथम श्रेणी ते चर्तुच श्रेणी अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.(६) मय्यत व्यक्तीला तात्काळ वनविभाग तथा महसुल विभाग यांचेकडून आर्थीक मदत तात्काळ मंजुर करण्यात यावी.(७) CCF कडून तात्काळ आदेश घेवून निमढेला गेट बंद करण्याचा लेखी आदेश तात्काळ देण्यात यावा.(८) जाळीचे कंपाऊड दिनांक. १५/०५/२०२४ पासून सुरु करण्यात येत असल्याचे लेखी हमीपत्र देण्यात यावे व न दिल्यास वनविभागावर कार्यवाही करण्याचे लेखी हमीपत्र देण्यात यावे.(१०) आता पर्यंत वनविभागाने वेळकाढुपणा केलेला आहे. आता त्याची वेळ व कालावधी ठरवून देण्याचे हमीपत्र देण्यात यावे.(११) निमढेला पर्यटन गेट तात्काळ बंद करण्यात न आल्यास परिसरातील जनतेकडून जर तोडफोड करुन बंद करण्यात आल्यास यास जनता दोषी न राहता वनविभागाचे कर्मचारी दोषी ठरविण्यात यावे.(१२) परिसरातील सर्व गुरेढोरे चराईसाठी (बफर आणि प्रादेशिक क्षेत्रामध्ये) पासेस देण्यात यावे.

(१३) हिंसक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. याकरिता
तालुका काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव तथा (लोकसभा उमेदवार) नामदेवराव किरसान,माजी जि.प.अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा समन्वयक सतिश वारजुकर, गजानन बुटके माजी जि.प‌.सदस्य तथा जिल्हा कॉग्रेस कमेटी, जेष्ठ कॉग्रेस नेते विवेक कापसे, तालुका उपाध्यक्ष चिमूर कॉग्रेस कमेटी राजुभाऊ चौधरी, फिशरमेन जिल्हा अध्यक्ष तथा तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, युवक काँग्रेस नागेंद्र चठ्ठे, पप्पू शेख, जावेद, गणेश दहिकर, रोहन नन्नावरे, अक्षय लांजेवार, विनोद ढाकुणकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved