Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* भिसी पोलिसांनी काही तासांत उलगडली गूढ घटना *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- जन्मदात्या वडिलांचा गळा आवळून खून करून त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा धक्कादायक प्रकार भिसी येथे उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच या घटनेचा पर्दाफाश झाला.मझिंद्र मेश्राम (वय ५१) असे मृतकाचे नाव असून त्यांना दारूचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत ते वारंवार घरात वाद घालत असत. २२ फेब्रुवारीच्या रात्रीही ते दारूच्या नशेत होते. त्यावेळी पत्नी व मोठा मुलगा रत्नापूर येथे गेले होते. घरात फक्त मझिंद्र मेश्राम व त्यांचा धाकटा मुलगा संदेश उपस्थित होता.वडिलांच्या शिवीगाळ व गैरवर्तनाला कंटाळून संदेशचा संताप अनावर झाला.
दोघांमध्ये जोरदार वाद होऊन झटापट झाली.संतापाच्या भरात संदेशने दोरीने वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केली.त्यानंतर संपूर्ण रात्र तो मृतदेहाजवळच थांबला. सकाळी स्वतः भिसी पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खोटी माहिती दिली.मात्र संदेशच्या जबाबात पोलिसांना विसंगती आढळली. घटनास्थळी पाहणी करताना परिस्थिती संशयास्पद असल्याचे दिसून आले.
कसून चौकशी केल्यानंतर संदेश गोंधळला आणि अखेर गुन्ह्याची कबुली देत “वडिलांच्या त्रासाला कंटाळून मीच त्यांचा खून केला,” अशी कबुली दिली.चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. फॉरेन्सिक पथकाने महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून ते न्यायालयीन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.भिसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगा सध्या पोलिस कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे.
ज्वाला समाचार सच का सामना