Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- कोपरी ते शेळी या 3 की. मी.रस्त्याची हालत 3 वर्षातच खस्ता झाली आहे .शासकीय तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या रस्त्याची अवस्था अवघ्या तीन वर्षांतच अत्यंत दयनीय झाली आहे. “दहा वर्षे टिकेल” असा दावा करणाऱ्या कंत्राटदाराचा आणि प्रशासनाचा दावा पावसाळ्यातील पहिल्या काही सरींनीच फोल ठरवला असून, सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेळी येथील नागरिकांचा संताप टोकाला पोहचला आहे . ग्रा. प.ने रीतसर याची दखल घेतली असून स्वप्नील वटाणे यांनी याची वारंवार तक्रार करून ही प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे .विशेष म्हणजे फलकावर दाखवलेले रस्ता बांधकाम व प्रत्यक्ष रस्ता बांधकाम यात देखील तफावत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे .

तीन वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले होते. मात्र, आज या रस्त्याची अवस्था ‘खड्डे आहेत की रस्ता?’ अशी झाली आहे. विशेषतः कोपरी पासून ते शेळी पर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून खालची खडी वर आली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्ता लवकर खराब झाला.खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत आहेत.आमच्या कराच्या पैशातून हे रस्ते बनवले जातात, पण तीन वर्षातच जर अशी अवस्था होत असेल, तर या कामाची चौकशी व्हायलाच हवी. संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी शेळी येथील नागरिक करत आहे .
*शेळी येथील रस्ता अल्पावधीत खराब झाला .विशेष म्हणजे या रस्त्यावरून कोणतीही जड वाहने जात नाही .रेती घाट या मार्गावर नाही .केवळ ऑटो व दुचाकी वाहतूक होते ,असे असताना ही हा रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला आहे.सर्वात गंभीर बाब म्हणजे फलकावर दाखवलेले काम व प्रत्यक्ष रस्ता यात अंतराचा मोठा घोळ आहे .याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता, टोलवाटोलवी करण्यात येत आहे.तक्रार केली त्याला दिशाभूल करणारे उत्तर दिल्या गेले .वारंवार मागणी करूनही इस्टिमेट दिल्या जात नाही .काय लपवायचे आहे समजण्यास मार्ग नाही .हा विषय शेळी रस्त्यापुरता मर्यादित नाही,जळका रस्त्याच्याही तक्रारी आहेत ,तालुक्यात निकृष्ट रस्ते बांधकामांची मोठी शृंखला निर्माण झाली आहे.आम्ही गप्प बसणार नाही,याच्या मुळाशी जाऊन जनतेच्या पैशाला कुणाच्या तरी घशात घालणाऱ्यांना वठणीवर आणू.मुख्य रस्ता वारंवार होत नसतो.सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम संशयास्पद आहे .तशीच वेळ आली तर गावकरी आंदोलन करतील*
ज्वाला समाचार सच का सामना