Breaking News

श्री संत तुकाराम महाराज सामाजिक सभागार चिमूर नगरपरिषदेकडून कुणबी समाजाला समर्पित

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- बाजार मैदान, चिमूर येथे शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता आस्था, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात ‘श्री संत तुकाराम महाराज सामाजिक सभागार’ याचे लोकार्पण संपन्न झाले. सत्कारमूर्ती पद्मश्री जनार्दन पंत बोधे यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया प्रमुख उपस्थित होते. लोकार्पणपूर्वी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दिलीप करहाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांनी परिसर भक्तिमय झाला. संत तुकाराम महाराजांच्या अभंग व भजनांच्या स्वरांनी उपस्थितांना भावविभोर केले.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून करण्यात आली, जे भारतीय संस्कृती व संत परंपरेप्रती आदराचे प्रतीक ठरले. कार्यक्रमाचे सुयोग्य व प्रभावी सूत्रसंचालन अश्विनी रोकडे यांनी केले, तर प्रस्तावना एकनाथ थुटे यांनी मांडत सभागृह उभारणीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मंचावर आमदार कीर्तिकुमार भांगडिया, पद्मश्री जनार्दन बोधे, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगराध्यक्ष गीता लिंगायत, उपाध्यक्ष संजय नवघडे, डॉ. विजय गावंडे, नीलम राचलवार, घनश्याम डुकरे, भीमराव ठावरी, गजानन शिंदे, विलास वडसकर, पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, जलपुरवठा सभापती दिगंबर भेंडे, राजू देवतळे, राजू झाडे, गजानन गुडधे, मनीष तुम्मपालीवार, डॉ. दीपक यावले, सहाय्यक गटविकास अधिकारी बांदूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या आमदार निधीतून सुमारे ९ कोटी रुपयांच्या खर्चातून चिमूर नगरपरिषदेकडून हे सर्वसुविधायुक्त सामाजिक सभागार उभारण्यात आले आहे. हे सभागार कुणबी समाजासह सर्व नागरिकांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved