Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान समितीचे अंतर्गत विदर्भातील एकमेव दाक्षिणात्य शंकराच्या दर्शनाला भाविकांचा जनसागर उसळणार असून शिव शंभू ग्रुप चिमूरच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून माघ कृष्ण १२ १४ मार्च शनिवारला सकाळी शंकर मूर्तीचे स्नान व अभिषेक पूर्ण करून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सायंकाळी ६ वाजता देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. माघ कृष्ण १३ १५ मार्च रविवारला एकमेव दाक्षिणात्य शंकर मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली राहील. दुपारी ३ वाजता भव्य वरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ वाजता शंकर भगवानचे लग्न पार्वती सोबत होणार आहे. तसेच माघ कृष्ण १४ दिनांक १६ मार्च सोमवारला सायंकाळी ५ वाजता पासून महाप्रसादचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिव शंभू ग्रुप चिमूर यांच्या वतीने करण्यात आले आहे
ज्वाला समाचार सच का सामना