Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत महापौर(महिला), उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. संबंधित विशेष सभेची सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली आहे. या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने नगरसेविका श्रीमती नीता ठाकरे यांनी तर काँग्रेसकडून नगरसेविका श्रीमती स्नेहल ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार नगरसेविका श्रीमती लीला हाथीबेड व काँग्रेसकडून यापदासाठी नगरसेवक विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केला.
विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करणार आहेत. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सभेला येताना निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र व निवडून आल्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) सोबत आणावेत असे आवाहन मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना