Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक ०१/०२/२०२६ रोजी फिर्यादी राहुल कुमार नुनबाबु रजत धंदा खाजगी नोगरी रा. रुपनगर बिहार यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिला की, त्यांनी वणी रोडचे उडान पुलाचे जवळ चालु असलेल्या रेल्वे चे कामा करीता आनलेले सिमेंट वणी बायपास उडाण पुलाचे खाली रेल्वे ट्रॅक जवळ ८५ पोते कि.अ.२९,००० रुपयाचे सिमेंट ठेवलेले होते ते रात्रीचे वेळी अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या बाबत पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिलेला होता त्यावरुन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशन येथिल तपास पथक सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा संदिप मुळे, पोका, विशाल राजुरकर, पोअ सौरभ कुलथे, पोहवा सुकराज यादव, पोहवा/नवघरे यांनी तपासाची चक्रे फिरवुन घटनास्थळी येणो येणोरे रस्ते व रोड चे सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहनी करुन तसेच गोपनीय माहितीचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी व आरोपीचे वाहना बाबत शोध घेण्यात आला व वाहान चोरी गेलेले सिमेंट जप्ती करण्यात आले.
जप्त मुददेमाल – एका बुलेरो पिकअप वाहन अंदाजे किंमत ४,००००० रुपये, १०० पोते सिमेंट अंदाजे किंमत ३०,००० रुपयाचे सिमेंट असा एकुन ४,३०,००० रुपयाचा मुददेमाला जप्ती करण्यात आला आहे.
पुढील कारवाई पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, अप्पर पोलिस अधिक्षक सा. चंद्रपूर, संतोष बाकल उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, यांचे नेतृत्वात सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा संदिप मुळे / २५७१, पोका, विशाल राजुरकर ब.न.०१, पोअ./सौरभ कुलथे ब. न.१०५३, पोहवा / सुकराज यादव ब.न. ७११, पोहवा/नवघरे ब.न. ९२४ यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना