Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :– चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा रथयात्रा नवरात्र महोत्सवाची दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपाल काल्याच्या कीर्तनाने भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. या प्रसंगी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गोपाल काल्याचा प्रसाद घेतला.

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हरी भक्त पारायण स्नेहल संतोष पित्रे (डोंबिवली, मुंबई) यांच्या भावस्पर्शी नारदीय कीर्तनाने नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ झाला होता. गेल्या ११ दिवसांत रथ सप्तमी निमित्त रथपूजन, गरुडराज वाहन परिक्रमा, भव्य हनुमान परिक्रमा तसेच अश्वारूढ रथयात्रा असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडले.

नवरात्र महोत्सवाच्या सांगतेनिमित्त दिनांक २ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता नारदीय कीर्तनाने गोपाल काल्याची सुरुवात झाली. काकडांच्या दिव्य प्रकाशात महाआरती करण्यात आली व त्यानंतर दहीहंडी फोडून गोपाल काला भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण परिसर “जय श्रीहरी”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.या नवरात्र महोत्सवात श्रीहरी बालाजी देवस्थान व भक्त मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पावन उत्सवाचे पुण्यलाभ घेतले.
ज्वाला समाचार सच का सामना