Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* म.गांधी विद्यालयात स्नेहसंमेलनाचे आयोजन *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- मुलांनी शाळेतील स्नेहसंम्मेलनात भाग घेतला त्यावेळी त्याचा डांन्स, त्याची कला बघण्यासाठी कींवा आपल्या मुलाने त्याची कला स्टेजवरून उत्तमरीत्या पार पाडावी यासाठी पालक जेवढी मेहनत घेतात तेवढीच मेहनत त्याच्या अभ्यासासाठी घेने गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण तर असलेच पाहीजे त्यासोबतच जनरल नॉलेज सुद्धा असने आवश्यक आहे. पालकांनी वेळोवेळी मुलांच्या शाळेत येऊन त्याची प्रगती कशी काय आहे याची माहीती घेने तसेच आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांनसह पालकांनीही अपडेट असने आवश्यक आहे असे मत आंबेनेरी केन्द्र प्रमुख ताराचंद रामटेके यांनी महात्मा गांधी विद्यालय येथील स्नेहसंम्मेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण संस्था भिसी व्दारा संचालीत महात्मा गांधी प्राथमीक विद्यालय, विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भिसी यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंम्मेलन व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान तिन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहील्या दिवशी स्नेहसंम्मेलन व माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आंबेनेरी केन्द्र प्रमुख ताराचंद रामटेके, कार्यक्रमाचे अध्यक्ष पो. शि.पिल्लेवान मॅडम, प्रमुख अतिथी नगरसेवक अक्षय नागपूरे, रूपेश जांभुळे, मंजुताई रामटेके, वृंदा खडसंग,भिसी व्यापारी असोशिएशन चे अध्यक्ष व पत्रकार पंकज मिश्रा, वामन गेडाम, हिरालाल तुंबेकर मंचावर उपस्थीत होते.
तिन दिवसीय या कार्यक्रमात सांस्कृतीक कार्यक्रम, नृत्य, नाटक, नक्कल आदी कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना स्वरूची भोजन देऊन करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक राजु आष्टनकर, थुटे सर, राणे सर, बोरकर सर, खडके सर, नागपूरे सर, काळे सर, गोंडाने सर, ठेंगने सर, खाटे सर, देवतळे सर, कुमले सर, आष्टनकर मॅडम, ढाले मॅडम व विद्यार्थांनी परीश्रम घेतले.
ज्वाला समाचार सच का सामना