Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* भिसी पोलिसांनी नाकाबंदी करून अवैधरित्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवर केली कारवाई *
* अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या दोघांविरुध्द पोलिसांनी केला गुन्हा दाखल *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर :- आज दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे भिसी पोलीसांनी भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रोडवर कॅनलजवळ नाकाबंदी करुन सापळा रचुन अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची उपसा करुन चोरटी वाहतुक करीता असलेल्या एका विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडुन रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे (१) वैभव प्रकाश कुंभरे वय २९ वर्ष रा. बोळधा (२) लक्ष्मण मारोती शिवरकर वय ५२ वर्ष रा. पारडपार यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे भारतीय न्याय संहिता-२०२३ आणि म.ज.म.स. व मो.वा.का. चे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपीच्या ताब्यातील अवैध गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतुक करण्याकरीता वापरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह किं. अं.६,००,०००/- रु. आणि ट्रॅक्टर मधील ०१ ब्रास गौण खनिज (रेती) किं.५,०००/- रु. असा एकुण ६,०५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा अतिरिक्त कार्य. चिमूर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे यांचे नेतृत्वात पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे, पोअं सतिश झिलपे, वैभव गोहणे सर्व पोस्टे भिसी यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना