Breaking News

अवैधरित्या जनावराची वाहतुक करणाऱ्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* कत्तली साठी नेत असलेल्या ३४ जनावर (गौवंश) ची सुटका *

* आयशर वाहनासह ३३,६५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक १२ डिसेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत खरबी टोल प्लाझा येथे नाकाबंदी करुन एक आयशर क्रमांक एम.एच.४०-सी.टी.७८९२ सापळा रचुन पकडला व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात एकुण ३४ नग गोवंशीय जनावरे (गाई, बैल) कत्तली करीता अवैधरित्या वाहतुक करुन नेत असतांना मिळुन आल्याने सदर आरोपी नामे सरगम गुलाबसिंह धुर्वे वय ३३ वर्ष रा. शिवनी (मध्यप्रदेश) आणि पाहीजे असलेला आरोपी तौसिफ खान रा. नागपूर व इतर याचे विरुध्द पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपीचे ताब्यातुन एकुण ३४ नग गोवंशीय जनावरे (गाई, बैल) कि. अं.८,५०,०००/- रु. आणि एक आयशर क्रमांक एम. एच.४०-सी.टी. ७८९२ कि. अं.२५,००,०००/- रु. व आरोपीचा मोबाईल किं.अं. १५,०००/- असा एकुण ३३,६५,०००/- रु.चा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा नितेश महात्मे, गणेश भोयर, पोअं. अजीत शेन्डे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved