Breaking News

शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अलाॅयसेस हायस्कूल चे वर्चस्व

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

*पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो-डी वाय एस पी संदीप गावित*

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे सेंट अलॉयसेस स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलांच्या 14, 17, 19, वयोगटाच्या बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या हस्ते चेस बोर्ड वरती सोंगट्यांची चाल चालुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सिस्टर शीला या होत्या.

सदर प्रसंगी भुसावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक देशोन्नती चे प्रेम परदेशी, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, ईबटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रभाकर बोरसे., मेघश्याम शिंदे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. प्रदीप साखरे यांनी स्पर्धेविषयी ची माहिती दिली.

नंतर उद्घाटक डी वाय एस पी संदीप गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व पराजयाने खचून न जाता, विजयाने माजून जाऊ नये. या दोन्ही परिस्थितीत समतोल राखणे महत्त्वाचे आहे, कारण पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो. हरलेल्या संघांनी पराभवाला खचून न जाता पुन्हा सराव करून पुढील स्पर्धेत यश संपादन करावे जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका जिल्हा राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे. तालुक्याचे जिल्हास्तरावरती प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रेम परदेशी व प्राचार्य शिला यांनी सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी भेट दिली ‌ सर्व खेळाडूंची विचारपूस करून खेळा व स्पर्धेसंबंधी अडचणी ची विचारपूस केली. तसेच मार्गदर्शन करताना.

दिव्या देशमुखने 2025 च्या फिडे वुमेन्स चेस वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. तिने जॉर्जिया मधील बाटुमी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताचीच अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला टायब्रेकरमध्ये पराभूत केले. दिव्या देशमुख ही वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ती आपल्याच महाराष्ट्रातील नागपूर येथील आहे आपण सुद्धा अशा जागतिक स्तराच्या स्पर्धेत पर्यंत पोहोचावे अशा शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत 157 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *14 वर्षाखालील मुले निकाल*
1)समध्य श्रीवास्तव , वर्ड स्कूल ,
2) तडवी अमन , के नारखेडे.
3) आर्यन पाटील , एन के नारखेडे.
4) शिवांश पाटील , सेंट अलायसेस.
5) हिमांशू सरोदे. एन के. नारखेडे‌ *17 वर्षाखालील मुले निकाल*
१) अंगत मंगलानी , सेंट अलायसिस
2) दर्शन पाटील , ताप्ती पब्लिक स्कूल.
3) सोहम चौधरी., सेंट अलायसेस.
4) युग कोट्याच्या , सेंट अलायसेस ,
5) मनीष माळी , महात्मा गांधी वरणगाव. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी व विजया साठी सर्वं खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या . मुख्य ऑर्बिट म्हणून मिलिंद शिरोडे यांनी पंच म्हणून श्रीमती वंदना ठोके , श्रीमती नम्रता गुरव,पी.एस.बोरसे , सुनिल चौधरी , विनय काळे , सुमितदास गुप्ता , बॉबी पवार , तौसीफ कुरेशी , गणेश बोदडे , पुष्कराज शेळके , दिपक बाविस्कर , अलेस्टर सिमोन्स , निलेश नेहते आदी . काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व सेंट अलॉयसेस स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मेघेश्याम शिंदे यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved