Breaking News

भिसी पोलीसांची अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* अवैध देशी दारु आणि मोटार सायकलसह ८९, २००/- रुपयाचा माल जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक २६/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन भिसी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पोस्टे ह‌द्दीत अवैध धंद्याला कार्यवाहीसाठी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा लोहारा येथील रहिवासी नामे प्रज्वल धारणे हा अवैधरित्या दारुची वाहतुक करणार आहे. यावरुन भिसी पोलीसांनी पंचासह बोडदा नदीवर सापळा रचुन दबा धरुन बसले असता सदर आरोपी मोटार सायकल ने येत असतांना दिसताच त्याला थांबवून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यात १८० एमएलच्या १९२ कोकण कंपनीच्या देशी दारु निपा एकुण १९,२००/- रु. किंमतीचा अवैध देशी दारुचा माल मिळुन आल्याने सदर देशी दारु आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन मोटार सायकल किंमत ७०,०००/७ रु. असा एकुण ८९,२००/- रुपयाचा माल हस्तगत करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली भिसी ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे यांचे नेतृत्वात पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे, पोअं श्रीकांत वाढवी सर्व पोलीस स्टेशन भिसी यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved