jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा :- हिंगणघाट तालुक्यातील दरोडा या छोट्याशा गावातील रहवासी गोवर्धन कांबळे यांची मुलगी दीक्षा गोवर्धन कांबळे हिने नीट परीक्षेमध्ये यश प्राप्त करून अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये देशात 642 वे स्थान प्राप्त केले. नीट परीक्षेतील प्राविण्याच्या आधारावर दिक्षाला राष्ट्रीय स्तरावरील AIIMS गुवाहाटी येथे MBBS अभ्यासक्रमा करीता निवड झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये द्वारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर येथे निवड झालेली आहे.

दिक्षाने यशाचे श्रेय आई वडील व तिच्या शिक्षकांना दिलेले आहे. प्राध्यापक नितेश कांबळे सर, प्रलय तेलंग, आंबेडकर शाळेचे माजी प्राचार्य सुधीर राऊत सर, बामसेफचे संयोजक अशोक मुन, दिलीप भगत, संजय भगत, आनंद भगत, मोरेश्वर जवादे व बामसेफच्या सर्व कमिटीने दीक्षा कांबळे व तिच्या आई वडिलांचा सत्कार केला. या प्रसंगी गावकरी व बामसेफचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना