Breaking News

चंद्रपूर येथील अष्टभुजा वार्डातील युवकाचा खुनाचा गुन्हा उघड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* अवघ्या दोन तासात ४ आरोपीला पोलीसांनी केली अटक *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक ०४/०८/२०२५ रोजी चे रात्रौ ०३:०० वाजता चे सुमारास रामनगर पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त झाली की, अष्टभुजा वार्ड चंद्रपूर येथील छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ वय ३५ वर्ष यास मारहाण करुन कोणीतरी खुन केला आहे. यावरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ६२१/२०२५ कलम १०३ (१), ३३३, ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन त्यांचा शोध घेवून अटक करणे कामी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले. त्यानुसार पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हयातील आरोपी निष्पन्न करणेकामी तात्काळ घटनास्थळी पोहचून परिसरात गोपनियरित्या कौशल्यपूर्ण तपास करुन यातील मृतकास मारहाण करणारे आरोपी निष्पन्न केले.

सदर गुन्हयात अवध्या दोन तासात यातील मृतकास जबर मारहाण करुन त्याचा खुन करणारे आरोपी नामे (१) सुमोहित उर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम वय २६ वर्ष, (२) टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे वय ३० वर्ष, (३) सुलतान अली साबीर अली वय ३० वर्ष, (४) बबलु मुनीर सय्यद वय ३८ वर्ष सर्व रा. अष्टभुजी वार्ड चंद्रपूर यांचा अटक करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रशांत लभाने, पोरटे रामनगर हे करीत आहे.

सदरची कामगरी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि देवाजी नरोटे, सपोनि श्री हनुमान उगले, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि प्रशांत लभाने, सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि हिराचंद गव्हारे, पोउपनि अतुल राठोड, पो.अं./गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालु यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रजनीकांत पुठठावार, इंदल राठोड, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, रविकुमार ठेंगळे, हिरा गुप्ता, संदेश सोनारकर, प्रशांत झाडे, सुरेश कुरेवार, रुपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved