jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा :- आज दि.20/07/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी अविनाश शरबत भोसले वय 40 वर्ष हा त्याचे पत्नीसह तरोडा पारधी बेडा येथून हिंगणघाट कडेगावठी मोहा दारू ची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने,पोलीस अमलदार प्रमोद डडमल,सागर सामृतवार यांनी नांदगाव चौक उडान पूल वर नाकेबंदी करुन आरोपी अविनाश शरबत भोसले व त्याची पत्नी सौ अनिता अविनाश भोसले रा तरोडा याचेवर प्रोरेड केला असता आरोपी हे त्याचे ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर मोपेड गाडी क्रमांक.एम.एच 32 ए.डब्लु 0085 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन 6 प्लास्टिक पन्नीमध्ये 60 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 100 रू प्रमाणे 6000 रू.व टीव्हीएस मोपेड जुपिटर गाडी क्र.एम.एच 32 ए डब्लु 0085 किंमत 60,000 रु ,असा एकुण 66000 चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनूराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत साहेब, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर साहेब, व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे सा. याचे निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी केली.
ज्वाला समाचार सच का सामना