Breaking News

चिमुर येथील घरफोडीचा गुन्हा अवध्या ४८ तासाचे आत उघड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* ७ दिवसात चोरीतील ३८ तोळे सोन्याचे दागीने फिर्यादीस सुर्पूद *

* पोलीसांचे कर्तव्य, नागरिकांची कृतज्ञता *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक ११/०७/२०२५ रोजी रात्रौ फिर्यादी सौ. कल्पना मुर्लीधर गोन्नाडे वय ४६ वर्ष रा. प्रगती नगर चिमुर यांनी पोस्टे चिमुर ला येवुन तक्रार नोंदविली होती की, दिनांक.०६/०७/२०२५ ते दिनांक.११/०७/२०२५ दरम्यान त्या कुटूंबियांसह बाहेर गावी असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्याचे बंद घराचे दरवाज्याचा कुलूप तोडुन आंत प्रवेश करुन घरात ठेवलेल्या एकुण ३८ तोळे ६०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयाचा सखोल व तंज्ञबध्द पध्दतीने सर्वकष तपास करून दिनांक.१३/०७/२०२५ रोजी अवघ्या ४८ तासाचे आंत गुन्हयातील आरोपी अटक करुन आरोपीतांकडुन चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले होते.सर्व सामान्य नागरीक आयुष्यात अत्यंत परिश्रमाने आपल्या कुटूंबियांकरीता मौल्यवान वस्तु विकत घेतो आणि अशा परिश्रमातील मौल्यवान वस्तु चोरीस गेल्यावर त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांच्या मनाला जबरदस्त आघात पोहचतो. अशा परिस्थितीत सदरची मौल्यवान किंमती मालमत्ता गुन्हेगारांकडुन पोलीसांच्या उत्कृष्ठ तपास कार्यपध्दतीने हस्तगत झाल्यावर ती लवकरात लवकर संबंधीत फिर्यादी/नागरीकास परत मिळावी हे पोलीसांचे कर्तव्य असुन असे केल्यास त्याचा एक वेगळाच समाधान मनाला होईल या हेतुने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेने अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे कुशल नेतृत्वात चिमूर पोलीसांनी विद्यमान न्यायालयीन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन दिनांक १९ जुलै, २०२५ रोजी गुन्हा उघडकीस आल्याचे सात दिवसाचे आंत सदर गुन्हयातील हस्तगत मुद्देमाल-

(१)सोन्याची चपलाकंठी तिन पदरी वजन ५५.१६० ग्रॉम किं. ५,३५,०५२/- रु. (किं. आजचा बाजार भाव नुसार)

(२) सोन्याची पोत कोळ मनि व पदक वजन ५७.३७० ग्रॉम किं. ५,५६,४८९/- रु.

(३) सोन्याच्या बांगडया वजन ४०.१४० ग्रॉम किं. ३,८९,३५८/- रु.

(४) सोन्याची गोप वजन १२ ग्रॉम किं. १,१६,४००/- रु.

(५) सोन्याच्या पाटल्या दोन नग वजन ७३.४६० ग्रॉम किं. ७,१२,५६२/- रु.

(६) सोन्याचे कानातील टॉप्स एकुण ६ नग वजन २४.४२० ग्रॉम किं. २,३६,८७४/- रु.

(७) सोन्याचे कानातील गोल रिंग दोन नग वजन ५.७०० ग्रॉम किं. ५५,२९०/- रु.

(८) सोन्याचे चार नग आंगठ्या वजन २९.३८० ग्रॉम किं. २,८४,९८६/- रु.

(९) सोन्याचे कानातील टॉप्स दोन नग वजन २.३४० ग्रॉम किं. २२,६९८/- रु.

(१०) सोन्याची नथ वजन १.०४० ग्रॉम किं. १०,०८८/- रु.

(११) सोन्याची गळसोरी काळे मनी असलेले वजन २२.८३० ग्रॉम किं. २,२१,४५१/- रु.

(१२) सोन्याची पदक असलेली गळसोरी वजन १२.१४० ग्रॉम किं. १,१७,७५८/- रु.

(१३) सोन्याची नथ चौन एक नग वजन १२ ग्रॉम किं. २५,०००/- रु.

(१४) भारतीय चलनाचा २०० रु. च्या ३० नोटा एकुण ६,०००/- रु.

(१५) भारतीय चलनाचा २०० रु.च्या २८ नोटा एकुण ५,६००/- रु.

असा संपूर्ण मुद्देमाल दिनांक १९/०७/२०२५ रोजी पंचासमक्ष श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या हस्ते चिमुर पोलीसांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमुर येथे शपथकर्ता फिर्यादी सौ. कल्पना मुर्लीधर गोन्नाडे वय ४६ वर्ष रा.प्रगती नगर चिमुर यांना सुपूर्द/परत करण्यात आला आहे.संपुर्ण मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा समाधान झाल्याने परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved