jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार चिमूर तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींचे सन २०२५-२०३० या कालावधीसाठी सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले असून.सदर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम ०८/०७/२०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजताच्या सुमारास राजीव गांधी सभागृह,तहसिल कार्यालय,चिमुर येथे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी सरपंच पदाची सोडत जाहीर केली आहे.

जाहीर केलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती एस सी ८. अनुसूचित जाती महिला ८. अनुसूचित जमाती एस टी १६. अनुसूचित जमाती महिला १७. नाम मात्र प्रभाग ओबीसी १२. नाम मात्र प्रभाग ओबीसी महिला १३. सर्वसाधारण ९. व सर्वसाधारण महिला ९ असे ९२ ग्राम पंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून मागील आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गला आरक्षणातून डावलले होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हा मुद्दा लाऊन धरल्याने या वेळी आरक्षणात ओबीसी ना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना