jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भंगाराम वार्डातील एका घरात पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकून तलवार सह आरोपीला अटक करण्यात आल्याची घटना घडली.
दिनांक 18/06/2025 रोजी पो. स्टे. भद्रावती येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे भंगाराम वार्ड, भद्रावती परिसरामध्ये पेट्रोलिंग करित असता मुखबीरद्वारे माहिती मिळाली असता पोलिसांनी नामे शाहरुख बब्बू शेख वय 32 वर्ष राहणार भंगाराम वॉर्ड भद्रावती यांचे घरी धाड टाकून तपासणी केली असता अवैधरीत्या लोखंडी तलवार बाळगून असल्याचे दिसून आले असून आरोपी विरुद्ध कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना