Breaking News

मी शेवगांवकर चा दणका मोडला नगरपरिषदेत खोटा ले आउट सादर करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

मुंबई चे उद्योगपती विमान कंपनीचे मालक विठठल भास्कर भारदे व अनंत भास्कर भारदे यांच्यावर शेवगांव नगरपरिषदेने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक 12/06/2025 नगरपरिषद शेवगांव चे संजय विठ्ठल साखरे वय लिपीक नगर रचना विभाग शेवगाव नगरपरिषद शेवगाव अहिल्यानगर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीची हकीकत अशी कि गुन्ह्यात नमुद हकीकत अशी कि दिनांक 28/05/2025 रोजी फिर्यादी कर्तव्यावर हजर असतांना त्यांना श्रीमती विजया घाडगे मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगाव यांनी लेखी आदेश देवुन शेवगाव येथील गट न. 746/1 ते 5 मध्ये प्राप्त रेखांकन नकाशा मंजुरी हि नगर परिषदेमार्फत झालेली नाही. सदरील रेखांकर नकाशाची कागदपत्रे व आदेश बनावट स्वरुपाची असुन या बनावट कागद पत्राबाबत जमीन मालक विठठल भास्कर भारदे व अनंत भास्कर भारदे यांच्यावर फसवणुकीचा दाखल करने बाबत नगर परिषद यांचे वतीने प्राधिकृत केलेले असल्याने शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये शेवगाव नगरपिषद हद्दीतील गट न. 746/1 ते 5 मध्ये अनाधिकृत रहिवास परवानगी आदेश दिलेबाबत धनंजय मोहिनीराज भारदे व इतर रा. शेवगाव ता. शेवगाव ह.मु.पुणे यांचा अर्ज प्राप्त झाला त्यानुसार सदर अर्जाची प्रथम सुनावणी दिनांक 19/03/2025 रोजी दितीय सुनावणी 21/04/2025 रोजी अंतिम सुनावणी 23/05/2025 रोजी घेण्यात आलेली आहे.

सदर सुनावणी दरम्यान तक्रारदार व जागा मालक विठठल भास्कर भारदे व अनंत भास्कर भारदे रा. आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम मुंबई यांनी सुनावणी दरम्यान सादर केलेले म्हणने व त्यासोबत सादर केलेले कागदपत्रे यांची पाहणी केली असता सहायक नगररचनाकार नरेद्र तेलोरे नगर परिषद नगर अभियंता यांचा अभिप्राय खालील प्रमाणे.
1) गट क्र. 746 हे क्षेत्र मंजुर शेवगाव विकास योजनेनुसार भागांश रहिवास व भागांश शेती विभागात समाविष्ट आहे. 3N.C.R.B (एन.सी.आर.बी) 1.1.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म – १)
गट क्र. 746 मधील उत्तरेकडील भागांश क्षेत्र रहिवास विभागात येते तथापी प्राप्त रेखांकनातील क्षेत्र हे भागांश रहिवास व शेती विभागात दर्शविण्यात आल्याचे दिसुन येते तसेच या रेखांकन नकाशा व विकास परवानगी आदेश यावरील जा.क्र. व दिनांक याची नोंद या कार्यालयांकडील नोंदवहीत दिसुन येत नाही. गट क्र.746/1 ते 5 या क्षेत्राला रहिवास प्रयोजनार्थ रेखांकन मंजुरी या कार्यालया कडून देण्यात आलेली नाही.

सदर सुनावणी दरम्यान मा.मुख्याधिकारी नगरपरिषद यांचा आदेश खालील प्रमाणे.
1) अनंत भास्कर भारदे व विठठल भास्कर भारदे यांचे गट क्र. 746/1 ते 5 मधील क्षेत्राचा रहिवास प्रयोजनार्थं रेखांकन नकाशा व विकास परवानगी आदेश शेवगाव नगरपरिषद मार्फत देण्यात आलेला नाही.
2) गट क्र. 746/1 ते 5 या क्षेत्राचा रेखांकन नकाशा व विकास परवानगी आदेश हे बनावट स्वरूपाचे असुन संबंधीत जमीन मालकावर नगर परिषदेमार्फत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असा आदेश दिलेला आहे. 3) सुधारित विकास योजना शेवगाव मंजरीनंतर गट क्रमांक 746/1 ते 746/5 मधील भुखंड व बांधकामबाबत UDCPR-2020 तसेच गुंठेवारी अधिनीयमाच्या तरतुदीनुसार नियमानुकूल कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारे वरील प्रमाणे आदेश आहे.

तरी शेवगाव नगरपरिषद हद्दीतील गट क्र. 746/1 ते 746/5 मधील मालक यांनी आमचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनीयम 1966 चे कलम 44 व 45 नुसार रहिवास प्रयोजनार्थ रेखांकन मेजुरी घेणे अभिप्रेत होते. मात्र त्यांनी नियमानुसार कार्यवाही न करता दिनांक 27/02/2017 रोजी खोटा जावक क्रमांक देवुन आमचे कार्यालयाचा नेखांकन नकाशा व आदेशाची बनावट कागदपत्रे तसेच तात्कालीन मुख्याधिकारी नगर परिषद शेवगाव यांचे बनावट सही शिक्के तयार करुन त्यादवारे भुखंडाची विक्री करण्यात येवुन नगरपरिषद शेवगाव ची फसवणुक केली म्हणुन अनंत भास्कर भारदे व विठठल भास्कर भारदे दोन्ही रा. आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*ताजा कलम*

संशयित आरोपींची मुंबईला विमानकंपनी असल्याने व सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांसोबत उठ बस असल्याने प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक गावपुढारी आणि धनदांडग्यांकडून करण्यात आला असे अनेक बोगस प्रकरण आणि बनावट आर्डर मागे झाल्या आहेत त्यांना न्याय मिळणार का ??? नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी जुन्या 10 वर्षातील घोटाळे काढणार का बाहेर प्लॉटिंग क्षेत्रात चमचेगिरी करणाऱ्याची पाचावर धारण

[ क्रमशः]

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved