Breaking News

बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती व्यवसाय जोमाने सुरु

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* महसूल प्रशासन गाळ झोपेत *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात खुलेआम बिनधास्तपणे मोठ्या प्रमाणावर शहराला लागूनच असलेल्या उमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर द्वारे रेतीची वाहतूक करून शासकीय कामावर विक्री सुरु आहे. याबाबत महसूल प्रशासनाला माहिती असतांना सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तर जिल्हाधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

जनतेनी ग्राम महसूल अधिकारी यांना याबाबत ची माहिती दिली असता आम्ही शासकीय कामे करायची कि अवैधरित्या रेती वाहतूकिवर कारवाई करायची अशी उडवा – उडवीची उत्तरे दिली जात आहे. ग्राम महसूल अधिकारी यांनी काही महिण्याअगोदर अवैध रेती माफियांवर धडक कारवाईची मोहिम पथके तयार करून सुरु असल्याची माहिती दिली होती.तर काही रेती माफियांवर कारवाई सुद्धा झाली परंतु आता चित्र उलट दिसायला सुरुवात झाली आहे.

ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या उघळ्या डोळ्यासमोरून अवैध रेतीची जोमाने वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसून येत असून अक्षरशः चिमूर शहरात लावलेला तिसरा डोळा म्हणजेच CCTV कॅमेऱ्यात सुद्धा हे सर्व अवैध चित्रीकरण दिसून येत आहे तरीही या माफियांवर कसल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नाही.या ट्रॅक्टर च्या कर्कश आवाजाने जनतेची रात्रीची झोप उडाली असून जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या माफियांची सत्ताधारी राजकीय पक्षाशी नाळ जुळलेली असल्यानेतर अधिकारी घाबरत नसेल ना? अशी जनतेत चर्चा बघावायास मिळते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved