jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
वर्धा :- भीम जयंती चित्रपटाला आज तब्बल 13 दिवस पूर्ण झालेली आहे या चित्रपटाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून बौद्ध धम्म गुरु यांनी हा चित्रपट बघण्याचे आज दिनांक 11 जून 2025 ला गणेश टॉकीज वर्धा येथे सकाळी 12 ते 3 हा शो बघण्याचे ठरविले आहे व या शो करीता भंतेजींची भारी संख्या उपस्थित असून या चित्रपटाविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे की, भीम जयंती चित्रपट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित असून समाजात होणाऱ्या समस्येवर यात प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमत्राच्या आधारावर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे तरी सर्व बौद्ध धर्मियाना अशी विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकसंख्येने जाऊन चित्रपटगृहात बघावा. भीम जयंती या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि निर्मिती उमेश म्हैसकर यांनी केली असून या चित्रपटाचे क्रिएटिव हेड आणि सहनिर्माता वर्षा म्हैसकर आहे तसेच सहनिर्माता यशवंत भांडेकर, उज्वला भांडेकर, संतोष मेंढेकर हे असून चित्रपटाचे मुख्य कलाकार हर्षवर्धन शिंदे, श्रेयान्वी काशिद, अजय राठोड, उत्कर्ष म्हैसकर, उमेश म्हैसकर, प्रशांत तोतला, सिमा सपकाल ई. आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना