Breaking News

शिवसेना एकवटली स्मार्ट मिटर लावणे थांबवा अन्यथा???

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

 

*राळेगावमध्ये सक्ती थांबवा, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन*

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव :– राळेगाव शहरात महावितरण कंपनीकडून सुरु असलेल्या स्मार्ट प्रिपेड मिटर बसविण्याच्या सक्तीविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज तीव्र निषेध नोंदवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही कार्यवाही तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.शहरात कंत्राटदारामार्फत स्मार्ट मिटर बसविण्याचे काम वेगात सुरू असून, “आता मिटर बसवा नाहीतर २०,००० रुपये खर्च येईल” अशी भीती दाखवून नागरिकांवर दबाव टाकला जात आहे. ही सक्ती सामान्य ग्राहकांच्या हिताविरुद्ध असून, भविष्यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत ग्राहकांना या मिटरमुळे गंभीर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर शंकर गायधने व सुनिल क्षिरसागर यांच्या पुढाकारातून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले.चर्चेत विनोद काकडे (उपजिल्हा प्रमुख), विजय पाटील (तालुका प्रमुख), प्रशांत वारेकर (उपतालुका प्रमुख), पार्वताबाई मुखरे (महिला संघटिका), महेंद्र तुमाणे, सुनील सावरकर, श्रीकांत कोदाणे, प्रविण काळे, राकेश किन्हेकार, महादेव मुखरे, कुराडे काकू, संजय धोटे, शंतनू सहारे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.

शिवसेनेने निवेदनात सांगितले की, या मिटरमुळे नागरिकांना रात्री अपरात्री चार्जिंग करावी लागेल, विज पुरवठा थांबण्याची शक्यता राहील आणि गरीब ग्राहकांवर आर्थिक बोजा पडेल. महावितरण कंपनीने कोणतीही माहिती न देता हे मिटर बसवणे हे अन्यायकारक आहे.विद्युत कायदा 2003 मधील कलम 47(5) नुसार ग्राहकांना कोणते मिटर वापरायचे याचा अधिकार आहे. नागपूर येथील आंदोलनातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मिटर सक्तीने लावले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.या पार्श्वभूमीवर शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर ही सक्तीची कार्यवाही थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved