Breaking News

Mumbai : धावत्या लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू, दिवा-कोपरदरम्यान धक्कादायक घटना; प्रवासी हादरले

मुंबई:- कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, असंही समजतंय. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे लोकल जात होती. या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल गेला.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

किराणा सामान व पिकअप वाहन चोरी करणारे तिन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

    1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved