Welcome to Jwala samachar
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कारवाई “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक १३ मे, २०२५ रोजी पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीत गोपनिय माहितीचे आधारे गौतम नगर महाकाली वार्ड चंद्रपूर येथे अमीना नावाचे महिलेची खोली शोधुन पंचासमक्ष खोलीची पाहणी केली असता तेथे एक मुलगी दिसुन आल्याने तिची विचारपुस केली असता ती १७ वर्षाची असुन सदर खोली ही अमीना नावाच्या महिलेची असुन तिचे सांगनेवरुन देह व्यापार करीत असल्याचे सांगितले वरुन सदर महिला अमीना सैयद हिचे विरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध कामंक १४३ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ३, ४, ५, ६ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके, पोस्टे चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात पोउपनि संदीप बच्छेिरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय घोटे, नापोअं कपुरचंद खैरवार, पोअं इमरान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोअ सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना