मी शेवगावकरचा दणका मोडला शेवगांव शहरात बनावट दारू विकणारे परमिट रूम आणि हप्ते घेणारे दारूबंदीच्या अधिकाऱ्यांचा मणका
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगाव मधील सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. शहरात आणि तालुक्यात बनावट दारू आणि बनावट नोटा बनवणारी आणि खपवणारी
टोळी सक्रीय झाली आहे कि काय ??? बनावट नोटांमध्ये पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. शेवगाव तालुक्यातील विविध गावांमधील भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये या बनावट नोटा आणणारी टोळी फिरते, असा संशय व्यक्त होत आहे. शेवगांव च्या पोलिस यंत्रणेकडे या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यांनाच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेच्या अधिकाऱ्यां कडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. वरून आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना संबंधित यंत्रणेचेच याकडे दुर्लक्ष आहे. शेवगाव शहर व तालुक्यात बनावट नोटा वापरणारी टोळी शेवगाव तालुक्यात कार्यरत आहे का? अशी शंका
सर्वसामान्यां कडून व्यक्त केली जात आहे. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन व्यापाऱ्यांना फसवले जाते.
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अपटूडेट पोशाख असलेले हे लोक बाजारात बनावट नोटा चालवत आहेत. बनावट नोट सामान्य माणसाला लगेच ओळखता येत नाहीत. बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना तुमची ही नोट बनावट आहे, असे अधिकारी सांगतात. त्या नोटेवर लाल रंगाच्या पेनने फुली मारून संबंधिताचे नाव पत्ता घेऊन बनावट नोट जमा करण्याचे काम बँकेचे अधिकारी करतात. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी तर अशी नोट फाडू टाकतात. ग्राहकाने नोट परत मागितली, तरी दिली जात नाही. त्याचा आर्थिक तोटा होत असतानाच अधिकारी अरेरावीच्या भाषेत पंचनामा करून फिर्याद देऊ का, असा दम देतात. त्यामुळे सामान्य माणूस निमूटपणे हा प्रकार सहन करतो.सामान्यपणे रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने एखादी तरी नोट बनावट येतेच. बँकेचे अधिकारी नोट जमा करून घेतात हा सर्वसामान्य माणसावरील अन्याय तर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीका धडा कोण शिकविणार ??? असाच प्रकार बनावट दारू राजरोस आपल्या परमिट रूम मधून विकणाऱ्यांच्या बाबतीत झाला आहे. हॉटेल मध्ये गेल्यावर पहिली quatar ओरिजनल द्यायची मग पेग मागितल्यावर डुप्लिकेट द्यायची बनावट दारूचा सुळसुळाट पाथर्डी शहर ते शेवगांव हॉट लाईन आहे.
तालुक्यात नियुक्तीतीला असलेल्या दारूबंदीच्या साहेबांना प्रत्येक महिन्याच्या दहा ते बारा तारखेला “वटकण” पोहोच होत त्यामुळे एखादा ग्राहक डेरींग करून या अधिकाऱ्याकडे गेला तर या “वटकण च्या बदल्यात पटकन फोन जातो” त्याला पाथर्डी शहरात अनेकांच्या घरातच मोकळ्या बाटल्या बुच आणि बनावट दारू तयार करण्याचे मशीन फिट केल्याच्या चर्चा आहेत आणि त्याचा महापूर शेवगांव शहरातील व तालुक्यातील परमिट रूम बियर बार मध्ये राजरीस पाहायला मिळतो. या सर्व घाणेरड्या प्रकारात आपल्याच ग्राहकाला केमिकल ची दारू पाजून आपल्या दोन रुपयांच्या फायद्यासाठी कोण कोण सामील आहे अशी चर्चा मदिरापान करणाऱ्यां मध्ये सुरु आहे. *गेल्या कित्येक दिवसांपासून एकही मोठी रेड नाही काही कारवाई केल्याची बातमी पत्रकारांना दिली जात नाही काही ठराविक हॉटेल समोर दारूबंदीची गाडी तासनतास उभी असते मात्र कारवाई काही होत नाही त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जात नाही कारण काय ???.
*ताजा कलम*
*अमुक तमुक अधिकारी माझा जवळचा पाहुणा आहे आमचं कोण काय वाकड करणार अशी मग्रुरीची भाषा वरतून जाब विचारणाराला केली जाते ??? दारूबंदीचे अधिकारी आमच्या खीशात आहेत तुला कोणाकडे तक्रार करायची ती कर “म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा” दारूबंदी खात्याचा शेवगांव शहरात आणि तालुक्यात भोंगळा कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असा झाला आहे.*
*क्रमशः*
*लवकरच एक शिष्टमंडळ अजितदादा पवारांना बनवट दारूच्या बाटल्या संप्रेमभेट दयायला मुंबईला जाणार आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना