jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशनचे अंतर्गत येणाऱ्या खडसांगी जवळ पेट्रोलिंग करीत असताना चिमूर पोलिसांनी विना परवाना रेती भरलेला ट्रकवर कारवाई करून ट्रक जप्त केला.
सपोनि निशांत फुलेकर व पोउपनि नवखरे शासकीय वाहनाने पो.स्टे.सान्हा क्र.11/25 चे 10/08 वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांनी सपोनि फुलेकर यांना फोनद्वारे माहिती दिली.माहिती मिळताच बंदर ते खडसंगी या राष्ट्रीय महामार्गावर प्रेम बार जवळ ट्रक क्र. MH 36 AA 9833 हायवा विनापरवाना रेतीची वाहतुक करीत असतांना ट्रक ताब्यात घेतला.

हायवा ट्रक क्र. MH 36 AA 9833 निळ्या रंगाचा असून ट्रक चालकाचे नाव प्रविण अमर जांगळे वय 28 वर्ष रा. लावडी ता. पवनी जि. भंडारा असेसांगण्यात आले असून त्याला ताब्यात घेतले आहे. ट्रकची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर ट्रकमध्ये रेती दिसुन आली. त्यावरुन वाहन चालकास रेतीबाबत रॉयल्टी किंवा परवाना बाबत विचारणा केली असता ट्रक चालकाने कोणतीही रॉयल्टी किंवा परवाना नसल्याचे सांगितले. पंचासमक्ष पंचनामा कारवाई करुन ट्रक क्र. MH 36 AA 9833 किंमती 12,000,00/- व 8 ब्रास रेती किमत 32,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला.
आरोपी नामे ट्रक क्र. MH 36 AA 9833 चा चालक प्रविण अमर जांगळे वय 28 वर्ष रा. लावडी ता. पवनी जि. भंडारा याचेविरुद्ध कलम 303 (2) भा.न्या. सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना