Breaking News

विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे बस आगार प्रमुख यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-तालुक्यातील अनेक गावात अनियमित बस फेऱ्या येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले असून याची दखल घेत काँग्रेस सरसावत चिमूर बस आगार प्रमुख यांना निवेदन देत बस फेऱ्या वाढविण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील व राजू कापसे यांनी केली आहे.चिमूर कांपा मार्गावरील सिरस्पुर,शिवरा, कवडशी (डाक), मेटेपार, मांगलगाव,पिंपळगाव , कोटगाव,जांभूळघाट, पारडपार, आंबेनेरी, मालेवाडा,सावरगाव, कारघाटा ,उमरी ,खरकाडा, गडपिपरी येथील जवळपास २०० विद्यार्थी विद्यार्जन साठी येत असून मात्र बस फेऱ्या वेळे वर येत नसल्याने विद्यार्थ्याना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर विद्यार्थ्याना ताटकळत उभे राहावे लागत आहे.

मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्याना शिक्षण मिळावे यासाठी चिमूर तालुका काँग्रेस ने दखल घेवून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांसह बस आगार प्रमुख यांचेशी भेट घेवून निवेदन दिले.बस आगार प्रमुख यांना निवेदन देत असताना काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ .विजय गावंडे पाटील, माजी पस सदस्य राजू कापसे, माजी जीप सदस्य तथा काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष , विलास डांगे, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे ,मिडीया प्रमुख पप्पूभाई शेख , तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नांगेद्र चट्टे , जेष्ठ काँग्रेस नेते केशवरावजी वरखेडे, धनराजजी मालके ,तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी,देवानंद गावंडे,छतृगण पराते,बापूराव घोडमारे, घनश्याम रामटेके,भाऊजी टेकाम, जाबिर कुरेशी,मसूद इस्माईल शेख,शहनाज शेख आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved