पांढरकवडा पोलिस व स्थानीक गुन्हे शाखेच्या तपासाला मोठे यश
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरी (रुंजा) येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ता.२२ जुलै च्या पहाटे करण्यात आली होती. या प्रकरणात पांढरकवडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी कसोटीचा तपास करून एका आरोपीला अटक केली आहे.
यवतमाळ मार्गलगत असलेल्या पाथरी येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आबेडकर यांचे पुतळे आहे. याठिकाणी बौद्ध धर्मियांचे विविध सामाजीक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केल्या जात असतात. तसेच हा गाव शांत व सयंमी असताना ता. २२ जुलै रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर घाण टाकून त्यांची विटंबना केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण गावासह जिल्ह्यात रोष वाढला होता. या प्रकणाचे गांभीर्य लक्षत घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड हे घटनास्थळी दाखल झाले होते. तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, तसेच राजेंद्र गजरे आदी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक यांना आरोपींचा शोध घेऊन शक्य तेवढ्या लवकर अटक करण्याची मागणी संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन करण्यात आली होती. गावकऱ्यांचा वाढता रोष बघता तर ठिकाणी शांतीसभा घेऊन सर्वांना शांत व संयम ठेवण्याने आवाहन वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी दिवसरात्र एक करून अवघ्या ४८ तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली असून आरोपी हा त्याच गावातील असून मंगेश राजकुमार गोंडाने वय ३१ असे आहे. त्यांचेवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांचे मार्गदर्शनखाली सुरू आहे. यात पांढरकवडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केलेल्या उत्कृष्ट करवाईचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
ज्वाला समाचार सच का सामना