Breaking News

रविवारी चिमूर येथे भानुदास पोपटे यांच्या ग्रंथ प्रकाशनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील साहित्यिक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ’ या ग्रंथाच्या दोन खंडांचे प्रकाशन रविवार,दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.ग्रंथ प्रकाशन वरोरा येथील प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत ऍड. मनोहर पाटील यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थान चंद्रपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील, पत्रकार जितेंद्र सहारे उपस्थित राहणार आहेत.

भानुदास पोपटे यांचे आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.’आंबेडकरी चळवळीतील अलिखित संदर्भ’ या ग्रंथात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती समाजाला व्हावी, समाजाला त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळावी या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.या ग्रंथाचे आकर्षक आणि साजेसे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांनी चितारले आहे.ग्रंथ प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे,उपाध्यक्ष डॉ. मोहन येंडे, सहसचिव डॉ. दीपक गणवीर,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी, नितीन पाटील, कैलास बोरकर, प्रकाश कोडापे,मनोज राऊत,अजिंक्य पोपटे आदींनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved