Breaking News

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर :–ब्रम्हपुरी वनविभाग मधील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नेरी नियत क्षेत्रातील बोळधा बीट मधील सावरगाव (नेरी) येथील शेतकरी ईश्वर कुंभारे वय वर्षे ४५ असे अंदाजे असून तो नेहमी प्रमाणे आपल्या पत्नीसह शेतात काम करण्याकरिता गेले असता शेती जंगलात असल्याकारणास्त परिसरात वावरणाऱ्या वाघाने रेवनी गट, कक्ष क्र. १ मध्ये वाघाने हमला करून शेतकऱ्याला ठार केले व जवळपास अंदाजे १ कि.मी. पर्यंत ओढत नेले.

या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्राचे अधिकारी विशाल सालकर, नेरी नियत क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक रासेकर व बोळधा बीटाचे अतिरिक्त कार्यभार असलेले वनरक्षक व्ही. पी. घटनास्थळी दाखल झाले असून आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता घटनास्थळापासून १ कि.मी. वाघाने ओढत नेल्याचे दिसून आले. यावेळी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २०,०००/- रुपये वन विभागामार्फत देण्यात आले. सध्या शेतीचा व धानाचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी या परिसरात वावरताना काळजी घ्यावी व जंगलात जाऊ नये व जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे वन विभागामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना वनविभागातर्फे सूचित करण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved