माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांना निवेदन:-चर्चा करण्याचे आश्वासन
तालुका प्रतिनिध – शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेच्या सुरू असलेल्या वेळापत्रकात बदल करून दिनांक 10 जुलै 2023 पासून नवीन वेळापत्रक आदिवासी विभागाने जाहीर केले आहे जाहीर केलेले वेळापत्रक हे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे असल्याने ते त्वरित रद्द करावे यासाठी महाराष्ट्रभर संघटनांनी आदिवासी मंत्री व सरकार मधील आमदारांना निवेदन दिले आहे याचाच एक भाग म्हणून राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ अशोक उईके यांना आदिवासी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी निवेदन दिले आहे . आमदार अशोक उईके यांनी आपण या संदर्भात आदिवासी विकास मंत्री व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याचे सांगितले. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय शासन करीत आहे वेळापत्रकातील बदल करून आदिवासी विकास विभाग काय साध्य करणार आहे या संदर्भात विचार करावा असेही निवेदनात दिले आहे.

या आधी सुद्धा याच वेळेत शाळा सुरू करण्याचा हट्ट मागील काही मंत्र्यांच्या काळात झाला परंतु आमदार अशोक विके हे आदिवासी विकास मंत्री झाल्याच्या नंतर संघटनांनी त्यांची भेट घेतली त्यांनी सगळ्यांचे विचार लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर चर्चा करून वेळेमध्ये बदल करून आदिवासी विद्यार्थ्यांवर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याचे काम केले परंतु त्यानंतर सरकारमध्ये बदल झाले. आणि पुन्हा वेळापत्रकाचा मुद्दा ऐरणीवर आला पुन्हा जुन्याच पद्धतीचा वेळापत्रक लागू करण्याचा अट्टाहास आदिवासी विकास विभागाने सुरू केला आणि मत जाणून घेण्याच्या उद्देशाने माहिती घेतली परंतु सामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आश्रम शाळेत शिकत असून त्यांच्या भावना समजून न घेता पुन्हा हे वेळापत्रक लागू करणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय करणे होईल. म्हणून लागू होत असलेले वेळापत्रक त्वरित रद्द करावे यासाठी विविध संघटनांनी निवेदन दिले आहे यात बिरसा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतीश दादा पेंद्राम यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना सुद्धा निवेदन देऊन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे विविध संघटना यामध्ये आक्रमक झाल्या आहे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोहड यांनी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉ.अशोक उईके यांची भेट घेऊन वेळापत्रकाच्या संदर्भात चर्चा केली.
हे वेळापत्रक रद्द करावे यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आमदार अशोक उईके यांनी आदिवासी विकास मंत्री व भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नेते देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले हे वेळा वेळापत्रक रद्द झाल्यास विद्यार्थ्यां वरील आणि कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर होईल अशा पद्धतीची भावना साहेबराव मोहोड यांनी व्यक्त केली.तसेच माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आज राळेगावला भेट दिली असता त्यांना सुद्धा आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी भेट घेऊन वेळापत्रक रद्द करण्याच्या संदर्भात निवेदन दिल्याचे समजते देशपांडे यांनी सुद्धा या संदर्भात हे अन्यायकारक वेळापत्रक आपण रद्द करू यासाठी मंत्रालयात जाऊन आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले हे वेळापत्रक जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत यापुढेही आंदोलन मोर्चे सुरू राहील असेही साहेबराव मोहोड यांनी यावेळेस सांगितले यावेळेस त्यांच्यासोबत आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना